PM Vishvkarma Shilai Machine Yojana New Update 2024 शिलाई मशीन योजना बंद !

PM Vishvkarma Shilai Machine Yojana New Update
PM Vishvkarma Shilai Machine Yojana New Update

PM Vishvkarma Shilai Machine Yojana New Update 2024 – Pm Vishwakarma या योजनेअंतर्गत केंद्र शासनामार्फत भारतीय नागरिकांकरिता विविध क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या कामगारांकरिता या योजनेचा लाभ दिला जातो. 

याच धर्तीवर या योजने मार्फत भारतीय स्त्रियांकरिता मोफत शिलाई मशीन या योजने सुरुवात करण्यात आलेली होती, परंतु गेल्या काही दिवसापासून पीएम विश्वकर्मा या योजनेमध्ये फक्त आणि फक्त शिलाई मशीन याच घटकाकरिता सर्व महिलांनी अर्ज केलेले आहे.

हे नक्की वाचा : फवारणी पंप साठी अर्ज केला असेल तर हे काम करा

PM Vishvkarma Shilai Machine Yojana New Update शिलाई मशीन योजना बंद करण्याचे कारण

भारतातील असंघटित क्षेत्रातील विविध कामगारांना या योजनेच्या सहाय्याने आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या सहाय्याने विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांना या योजनेमध्ये अर्ज करता येतात परंतु योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत फक्त शिलाई मशीन म्हणजेच टेलर आणि गवंडी म्हणजेच बांधकाम कामगार या दोनच घटकाकरिता सर्व नागरिकांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

शिलाई मशीन या घटकाकरिता प्रत्येक गावातून सुमारे 300 ते 400 तेवढे अर्ज आलेले आहेत या कारणामुळे केंद्र शासनामार्फत शिलाई मशीन या घटकाकरिता नवीन अर्ज दाखल करणे यावरती स्थगिती आणलेली आहे. तसेच सेतू सुविधा चालक आणि सीएससी केंद्र चालक यांनी यापुढे शिलाई मशीन आणि गवंडी म्हणजेच बांधकाम कामगार या दोन घटकाकरिता अर्ज दाखल करू नये असे सक्त आवाहन करण्यात आले आहेत.

आदेश

पीएम विश्वकर्मा अंतर्गत शिलाई मशीन आणि गवंडी यांना वगळण्यात आले आहे कोणीही नोंदणी करू नये लाभ मिळणार नाही असा आदेश लातूर प्रशासना मार्फत काढण्यात आला आहे.

हे नक्की वाचा : अशी करा ई पिक पाहणी घरबसल्या संपूर्ण माहिती

मोफत शिलाई मशीन योजने करिता कोण अर्ज करू शकतात

मोफत शिलाई मशीन योजना ही शासनामार्फत बंद करण्यात आलेले असली तरीही ज्या गावांमध्ये शिलाई मशीन या घटकाकरिता कमी प्रमाणामध्ये अर्ज करण्यात आलेले असतील व ज्या भागातील प्रशासनाकडून या योजनेबद्दल प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेले नाही अशा ठिकाणी या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन योजनेकरिता अर्ज मागविण्यास चालू आहेत. तरी अशा जिल्ह्यातील नागरिकांनी सेतू सुविधा केंद्र मध्ये किंवा सीमेसी केंद्रामध्ये जाऊन आपले अर्ज दाखल करून घ्यावेत व या योजने चा लाभ घ्यावा.

परंतु लातूर जिल्ह्याप्रमाणे ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा ज्या प्रशासनाकडून अशा पद्धतीचे प्रसिद्धी पत्र काढण्यात आलेले आहे त्या भागातील नागरिकांनी व महिलांनी या घटकाकरिता अर्ज करू नयेत आपले अर्ज म्हणजेच रिजेक्ट करण्यात येतील.

हे नक्की वाचा: बांधकाम कामगार नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया

अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.

Leave a Comment