Favarni Pump Status Check 2024 – महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी मोफत फवारणी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावरती फवारणी पंप चे वाटप होणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज हे शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले होते. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांनी मोफत फवारणी पंपाकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केलेले आहेत.
या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्याचे असतील किंवा या योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. Favarni Pump Status Check
मोफत फवारणी पंप या योजने बद्दल सर्व माहिती वरील पोस्टमध्ये दिलेली आहे जसे की, योजनेसाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे इत्यादी.
हे नक्की वाचा : अशी करा ई पिक पाहणी घरबसल्या संपूर्ण माहिती
Favarni Pump Status Check अशी पहा अर्जाची सद्यस्थिती
मोफत फवारणी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केलेले आहेत. शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या पद्धतीने पहा.
- मोफत फवारणी पंप मध्ये भरलेल्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्याकरिता सर्वप्रथम शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल. महाडीबीटी ची अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही या पोर्टल वरती येऊ शकता.
या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या फोटो प्रमाणे एक डॅशबोर्ड म्हणजेच पेज ओपन होईल. त्यानंतर खालील पेज मध्ये दाखवलेल्या प्रमाणे अर्जदार येथे लॉगिन करा हा पर्याय दिसेल त्यामध्ये आपण अर्ज करत असताना दिलेला वापर करता आयडी आणि पासवर्ड माहित असेल तर वापर करता आयडी हा पर्याय निवडून तुम्ही अर्जदार लॉगिन करू शकता.
जर तुमच्याकडे तुमचा वापर करता आयडिया आणि पासवर्ड उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचा वापर करून देखील अर्जदार लॉगिन करून शकता. Favarni Pump Status Check
अर्जदार लोगिन केल्यानंतर खालील दिलेल्या पेज प्रमाणे एक पेज ओपन होईल त्यामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.
हे नक्की वाचा : क्रॉप इन्शुरन्स प्रक्रिया असा करा पिक विमा क्लेम.
तुम्ही मोफत फवारणी पंप या योजनेअंतर्गत केलेल्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्याकरिता तुम्हाला खालील पेज मध्ये दाखवलेल्या प्रमाणे डाव्या साईटला मी अर्ज केलेल्या बाबी म्हणून एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनला क्लिक करा.
या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर खाली विविध ऑप्शन दिसतील जसे की,
- अर्जाची प्रलंबित फी
- छाननीअंतर्गत अर्ज
- मंजूर अर्ज
- नाकारलेले अर्ज
मोफत फवारणी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्याकरिता तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायाला क्लिक करून तुम्ही भरलेल्या फवारणी पंपा ची स्थिती पाहू शकता.
- अर्जाची प्रलंबित फी – या पर्यायामध्ये जर शेतकऱ्यांचे अर्ज दिसत असतील तर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची पूर्ण प्रक्रिया झालेली नाही. या पर्यायांमध्ये जर शेतकऱ्याचा अर्ज दाखवत असेल तर शेतकऱ्यांना त्यांनी भरलेल्या घटकाकरिता परत एकदा भरून आपला अर्ज शासनाकडे दाखल करावा लागेल.
- छाननी अंतर्गत अर्ज – शेतकऱ्यांचे अर्ज जर या पर्यायांमध्ये दिसत असतील तर त्यांनी भरलेला अर्ज हा कृषी विभागाकडे प्रलंबित असेल.
- मंजूर अर्ज– या पर्यायांमधील शेतकऱ्यांचे अर्ज हे शासनामार्फत मंजूर झालेले असून त्यांना या योजनेचा पूर्णपणे लाभ घेतलेला असेल.
- नाकारलेले अर्ज– महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांनी भरलेले अर्ज हे काही ना काही कारणामुळे रद्द करण्यात आलेले असतील. Favarni Pump Status Check
हे नक्की वाचा: बांधकाम कामगार नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया
यामध्ये विविध कारणे असतील जसे की,
- शेतकऱ्यांकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न होणे,
- कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांनी भरलेल्या घटकाकरिता त्यांची निवड होणे, परंतु त्यांनी विहित कालावधीमध्ये आवश्यक ती कागदपत्रे न जोडल्यामुळे.
- तसेच शेतकऱ्यांनी भरलेल्या घटकाकरिता शासनाने मंजुरी देऊन संबंधिपत्र काढून देखील त्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये वस्तू खरेदी केलेले बिल न जोडल्यामुळे.
अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांचे अर्ज हे रद्द करण्यात येत असतात आणि रद्द होणारे अर्ज हे या ऑप्शनमध्ये पाहायला मिळतील. Favarni Pump Status Check
फवारणी पंपाचा शेतकऱ्यांना लाभ कशा पद्धतीने दिला जाणार?
महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांकरिता फवारणी पंप हे मोफत म्हणजे 100 टक्के अनुदानावरती मागेल त्या शेतकऱ्यांना दिले जाणार होते. परंतु महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग दाखवला असून प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेले आहे.
त्यामुळे या योजनेअंतर्गत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप केले जाणार आहे.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- Gay Gotha Yojana Online Apply. गाय गोठा अनुदान योजना 2025.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती
Leave a Comment