Pik Vima Status Check रब्बी पिक विमा 2023 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.

Pik Vima Status Check 2024– प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023, या हंगामातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना दिनांक 03 जुलै 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री शेतकरी पिक विमा ही योजना 2016 पासून राबविण्यात आलेली एक शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण अशी योजना आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप 2024 या हंगामाकरिता देखील अर्ज मागविण्यात आलेली आहेत.

शेतकऱ्यांना विमा कधी दिला जातो

  • हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे जर पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यास होणारे नुकसान या योजनेअंतर्गत दिले जाते.
  • पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेचा फायदा होतो.
  • पीक पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत जर नैसर्गिक आग, वीज कोसळले, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर येणे, पीक क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ पडणे, पावसातील खंड निर्माण होणे, पिकाला कीड व रोग येणे इत्यादी बाबीमुळे हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट या योजनेअंतर्गत भरून काढली जाते.
  • स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा ही यामध्ये समावेश होतो
  • नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे कारणे पश्चात नुकसान देखील या योजनेमध्ये समाविष्ट आहे.

वरील कोणत्याही कारणास्तव जर शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.

हे नक्की वाचा: प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024 स्वतः अर्ज करा

रब्बी पिक विमा 2023 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी 2023 साली रब्बी पिकाकरिता जर विमा अर्ज केला असेल तर अशा शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये विमा कंपनीकडून जमा करण्यात आलेली आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी 2023 या वर्षी रब्बी हंगामाचा विमा भरून देखील त्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा झालेली नाही.

ज्या शेतकऱ्यांना त्यांचा विम्याची रक्कम घेतलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी खालील दिलेल्या पद्धतीचा व्यवस्थितरीत्या वापर करून / उपयोग करून आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता किंवा जर आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर आपण त्याबद्दल सर्व माहिती पाहू शकता.

अधिकृत वेबसाईट येथे पहा
महिलांसाठी Private GroupJoin Free

Pik Vima Status Check Process.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 2023 या वर्षाच्या रब्बी पिकाचा विमा शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी खालील माहिती व्यवस्थित रित्या वाचून सांगितल्याप्रमाणे आपल्या अर्जाची सत्य स्थिती किंवा स्टेटस चेक करून आपला अर्ज तपासू शकता.

  • आपल्या अर्जाची पडताळणी करण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम प्रधानमंत्री पिक विमा योजना या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती यावे लागेल.
  • पिक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक ला क्लिक करून तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती याल.
  • या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये डाव्या साईडला फार्मर कॉर्नर/Farmer Corner असे एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून घ्यावे.
  • या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन पर्याय दिसतील जसे की Login For Farmer आणि Guest Farmer त्यापैकी लॉगिन फॉर फार्मर हे ऑप्शन सिलेक्ट करून पुढे जावे.
  • त्यानंतर आपल्यासमोर शेतकऱ्यांचा विमा भरत असताना लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाकून शेतकऱ्यांनी लॉगिन करून घ्यावे.
  • मोबाईल क्रमांक आणि कॅपच्या भरल्यावर नंतर आपल्या समोर शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकण्याचे ऑप्शन दिसेल शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओटीपी (Request For OTP) ला क्लिक करावे. त्यानंतर दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकून शेतकऱ्यांना लॉगिन करता येईल.
  • लॉगिन झाल्यानंतर आपल्यासमोर होम, एप्लीकेशन आणि अप्लाय फॉर इन्शुरन्स असे तीन ऑप्शन दिसतील त्यापैकी एप्लीकेशन या पर्यायावर क्लिक करून घ्या.
Pik Vima Status Check
Pik Vima Status Check
  • त्यानंतर तुम्ही केलेल्या आत्तापर्यंतच्या सर्व विमा चा तपशील दिसेल.
  • प्रधानमंत्री रब्बी पिक विमा 2023 चे स्टेटस चेक करण्याकरिता तुम्हाला समोर दिसत असलेल्या Previous Policy Details या पर्यायावर ती Year म्हणजेच 2023 हे वर्ष सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्याच समोर असलेला सीजन (Season) या पर्यायांमध्ये रब्बी हंगाम सरक करा.
  • अशी सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला 2023 या रब्बी हंगामामध्ये भरलेल्या तुमच्या विमा पावती बद्दल सर्व माहिती ओपन होईल.
Pik Vima Status Check
Pik Vima Status Check
  • त्यामध्ये तुम्हाला पॉलिसी नंबर, भरलेल्या पिकाचे नाव, एकूण क्षेत्र आणि भरलेली रक्कम सर्व माहिती दिसेल
Pik Vima Status Check
Pik Vima Status Check
  • आणि शेवटच्या कॉलम मध्ये क्लेम डिटेल्स (Claim Details) हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही भरलेल्या पिकाची सद्यस्थिती जाणू शकता.
  • जसे की शेतकऱ्यांचे खाते नंबर, क्लेम टाईप, शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम तसेच शेतकऱ्यांना ही रक्कम किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे आणि ट्रांजेक्शनचा यूटीआर (UTR)
Pik Vima Status Check
Pik Vima Status Check

तरी वरी दिलेल्या सर्व माहितीचा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित रित्या वापर करून तुम्ही तुमच्या भरलेल्या विमा योजने चा अर्जाची सत्य स्थिती आणि मिळालेली विमा रक्कम अशी सर्व माहिती तुम्ही घर बसल्या पाहू शकता.

हेक्टरी प्रमाणे वितरित रक्कम

अ क्रपिकाचे नाव हे.रक्कम
1कांदा48600/- रुपये प्रमाणे
2हरभरा24215/- रुपये प्रमाणे
3ज्वारी16360/- रुपये प्रमाणे

सद्यस्थितीमध्ये गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या भरलेल्या विम्याबद्दल तक्रारी दाखल केल्या होत्या फक्त अशाच शेतकऱ्यांना दिनांक 3 जुलै 2024 या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

तरी अद्याप ज्या शेतकऱ्यांना विमा रक्कम भेटलेली नाही अशा शेतकऱ्यांना 15 जुलै ते 30 जुलै या दरम्यान विम्याची रक्कम भेटण्याची शक्यता आहे.

सर्व शेतकऱ्यांनी आपण भरलेल्या रब्बी हंगामातील विम्याची सद्यस्थिती किंवा स्टेटस लवकरात लवकर चेक करून घ्या आणि जर आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी किंवा अडचण असेल तर तुम्ही तुमच्या जवळील कृषी विभागामध्ये जाऊन त्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता.

जर तुम्हाला अर्ज करण्याकरिता काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करून माहिती घेऊ शकता किंवा आपल्या जवळील सीएससी (CSC) सेंटरला भेट देऊन आपण आपला पिक विमा status Check करू शकता.

पिक विमा भरल्यानंतर ई पीक पाहणी का करावी, कधी करावी आणि कशी करावी याबद्दल पूर्ण माहिती अपडेट करिता आमचा Group जॉईन करा.

तसेच पिक विमा भरल्यानंतर आपल्या पिकाची झालेली नुकसान करिता ऑनलाइन तक्रार कशी नोंदणी करावी अशा सर्व अपडेट करिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Pik Vima Status Check रब्बी पिक विमा 2023 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.”

Leave a Comment

× Whatsapp ग्रुप जॉईन करा 👉