प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना बद्दल माहिती
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही गडबडीत चालू करण्यात आली ही योजना राबवण्यासाठी खूप कमी वेळात अनेक लोकांना लाभ द्यायचा होता यामुळे गडबडीत अनेकांचा आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर, सातबारा नंबर चुकीचा भरला गेला त्यामुळे अनेकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. काहींना पहिला हप्ता मिळाला आहे पण पुढील हफ्ते मिळाले नाहीत कारण त्यांची माहिती चुकीची भरली गेली आहे यासाठी आता आपली माहिती नक्की बरोबर भरली आहे का चुकीची भरली आहे ते आपण आपल्या घरी बसून मोबाइल द्वारे जाणून घेवू शकता.यासाठी आपल्याकडे आधार नंबर किंवा मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.
आपल्या अर्जाची सध्यस्थिति कशी पहावी
आपल्या अर्जाची आणि मिळालेल्या पैशाची स्थिति पहाण्यासाठी इथे क्लिक करा
लिंक वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपेन होईल तिथे सर्व प्रथम आधार नंबर / बँक अकाऊंट नंबर / मोबाइल नंबर टाकावा व कॅपच्या कोड टाका व get data वर क्लिक करा.
नवीन पेज ओपेन होईल यात आपल्याला आपली सपूर्ण माहिती दाखवली
असा करा नविन अर्ज असा करा
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये नविन सुविधा चालू केली आहे, मा.नरेंद्र मोदी यांच्या द्वारे जे गरीब आणि वंचित घटक या योजनेचा फायदा घेवू शकले नाहीत किवा ज्यांना ह्या योजनेची माहिती नसल्याने या योजनेचा लाभ त्यांना मिळाला नाही यांच्यासाठी आता ते नव्याने ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. यासाठी काही पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे यात अर्जदारच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे
नाव, बँक अकाऊंट नंबर,मोबाइल नंबर, गावाचे नाव ,रजिस्टर नंबर/स्टेट्स ,मिळालेले हफ्ते किवा माहिती भरताना चुकली असेल तर त्याची माहिती इथे पाहायला मिळते
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा / आठ अ नंबर / खाते नंबर
नवीन अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या शासनाच्या अधिकृत http://www.pmkisan.gov.in वेबसाइट वर जाण्यासाठि दीलेल्या लिंक वर क्लिक करा.
- तिथे गेल्यावर farmers coner वर क्लिक करा
- नंतर new farmer registration वर क्लिक करा
- इथे विचारलेले सपूर्ण माहिती भरून save वर क्लिक करा
चुकीच्या माहितीत इथे करा बदल
चुकीची माहिती भरल्याने जर तुम्हाला या योजनेचे पैसे खात्यावर जमा होत नसतील तर आपण आपल्या गावाच्या तलाठी /कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज करून माहितीत सुधारणा करू शकता त्यामुळे इथून पुढे आपणाला या योजनेचा लाभ तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
योजनेतून मिळणारा लाभ
या योजनेत प्रत्येक लाभार्थीला प्रती वार्षिक एकूण 6000 रुपये 2000 रूपयाच्या समान तीन हप्त्यात लाभार्थीच्या आधार लिंकड बँक खात्यात जमा होतील