Kapus Soyabean Anudan Form 2024 – महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांकरिता महाराष्ट्र शासनाकडून एक आनंदाची बातमी आहे की, सन 2023 मधील खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता अनुदान देण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे.
तर आजच्या या लेखांमध्ये आपण खरीप हंगाम 2023 अनुदाना करिता कोणते शेतकरी पात्र असतील, मिळणारे अनुदान तसेच अनुदान मिळवण्याकरिता अर्जाची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
पात्रता
- खरीप हंगाम 2023 या वर्षीचे अनुदान मिळवण्याकरिता शेतकऱ्यांनी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे जसे की, नुकत्याच प्रकाशित केलेल्या शासन जीआर मध्ये कळविण्यात आले आहे की, खरीप हंगाम 2023 मधील अनुदान हे सोयाबीन आणि कापूस या पिकांची लागवड केलेल्या उत्पादक शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे.
- तसेच अनुदानाची रक्कम मिळवण्याकरिता शेतकऱ्यांनी त्यांच्या सातबारा उतारा वरती सण 2023 साली आपल्या पिकाची नोंद त्यांच्या सातबारा उताऱ्याच्या पेऱ्यामध्ये करणे आवश्यक आणि बंधनकारक असेल आणि ही नोंद ई पीक पाहणी या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केलेली असणे आवश्यक आहे.
- ई पिक पाहणी केलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाच या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. Kapus Soyabean Anudan Form 2024
हे नक्की वाचा : अशी करा ई पिक पाहणी घरबसल्या संपूर्ण माहिती
अनुदानासाठी मंजूर पिके
खरीप हंगाम 2023 या वर्षातील सोयाबीन आणि कापूस या पिका करिता अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
मिळणारे अनुदान
खरीप हंगाम 2023 या वर्षाच्या सोयाबीन आणि कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित रक्कम ही हेक्टरी 5000 रुपये देण्यात येणार आहे.
शासनमान्य जीआर पाण्यासाठी येथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे जसे की,
- पात्र शेतकऱ्याचे आधार कार्ड
- चालू मोबाईल क्रमांक
- सातबारा आणि 8 अ
- संमती पत्र
- ना हरकत. (जर शेतकरी सामायिक खातेदार असेल तर सामायिक खातेदार ना हरकत पत्र आवश्यक)
खरीप अनुदान 2023 अर्ज प्रक्रिया
खरीप हंगाम 2023 या वर्षाच्या सोयाबीन आणि कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेण्य करिता अर्ज करावे लागणार आहेत अर्ज करण्यासाठी खालील बाबींचा आधार घ्या.जसे की,
- अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला शासनामार्फत मिळालेले संमती पत्र डाउनलोड करून घ्यावे लागेल. संमती पत्राची लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही संमती पत्र मिळवू शकता.
- वरील संमती पत्र डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते संमती पत्र व्यवस्थित रित्या प्रिंट काढून घ्यावे लागेल. प्रिंट केल्यानंतर त्या अर्जामध्ये शेतकऱ्यांचा जिल्हा, तालुका आणि शेताचे शिवार याबद्दल माहिती भरून द्या.
- त्यानंतर शेतकऱ्यांचे वैयक्तिक तपशील भरून घ्यावे. वैयक्तिक तपशील भरत असताना शेतकऱ्याची संपूर्ण माहिती ही त्याच्या आधार कार्ड नुसार मराठी आली इंग्रजी मध्ये असणे आवश्यक आहे.
- कारण की आपण हे संमती पत्र तुमच्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ तुमची ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो यासंदर्भामध्ये भरून देत आहोत. तरी माहिती भरत असताना सर्व माहिती ही व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक भरून द्यावे.
- तसेच तुमचा आधार क्रमांक आणि शेतकऱ्याचा चालू असलेला मोबाईल क्रमांक टाकून उजव्या कोपऱ्यामध्ये अर्जदाराची सही व नाव यामध्ये शेतकऱ्याचे नाव आणि सही करून घ्या.
- अशा पद्धतीने तुम्ही अनुदानाचा लाभ घेण्याकरिता घरबसल्या अर्ज करू शकता.
- पात्र शेतकरी जर सामायिक खातेदार असेल तर त्यांना सामायिक खातेदार बाबत ना हरकत पत्र दिलेल्या अर्जासोबत जोडणे हे बंधनकारक राहील.
- सामायिक खातेदार बाबत ना हरकत पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्याच्या आधारे तुम्ही ना हरकत पत्र डाऊनलोड करू शकतात.
- ना हरकत प्रमाणपत्र प्रिंट केल्या नंतर देखील त्यामध्ये शेतकऱ्याचा जिल्हा तालुका आणि शेतीचे शिवार याबद्दल माहिती भरून घ्या.
- त्यानंतर त्या शिवारातील शेत जमिनीचा संयुक्त खाते क्रमांक हा तुमच्या प्रमाणे टाकून द्या. ऑटो खाते क्रमांक टाकून झाल्यानंतर त्यामध्ये विचारेल की सामाईक क्षेत्राचे हिस्सेदार किती आहे तर त्याबद्दल माहिती भरून घ्या.
- या संमती पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की खरीप अनुदान 2023 मध्ये मिळणारी रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत.
- याचा अर्थ असा की तुमच्यापैकी एकाच्या खात्यामध्ये खरीप हंगामातील अनुदानाची रक्कम ही देण्यात येणार आहे.
- खातेदाराच्या नावे खरीप हंगामातील अनुदानाची रक्कम जमा करायची असेल त्या खातेदाराचे आधार प्रमाणे मराठी मध्ये आणि इंग्रजी मध्ये नाव तसेच खातेदाराचा आधार क्रमांक आणि आधार शी संलग्न मोबाईल क्रमांक भरून घ्या.
- शेवटी खातेदाराचे नाव आणि समत्ती बाबत सर्व खातेदारांच्या सह्या करून घ्या.
- आणि भरलेला अर्ज आपल्या संबद्धित कृषी सहाय्यकाकडे अर्ज दाखल/जमा करा.
- अशा पद्धतीने आपण सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थित रित्या अर्ज करू शकता आणि खरीप अनुदान 2023 चा लाभ घेऊ शकता.
हे देखील वाचा : मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या
Kapus Soyabean Anudan Form 2024
अर्ज भरून कोठे दाखल करावा
वरील अर्ज व्यवस्थित रित्या भरून झाल्या नंतर भरलेला अर्ज आणि आधार कार्ड पासबुक आपल्या संबद्धित कृषी सहाय्यकाकडे अर्ज दाखल/जमा करू शकता.
टीप : हा अर्ज जर भरला तरच आपल्याला आपले खरीप अनुदान जमा होणार आहे. त्या मुळे सर्व शेतकऱ्यानी हा अर्ज लवकरात लवकर भरावा.
अर्ज केल्या नंतर पुढील सर्व प्रक्रिया या पेज च्या माध्यमातून कळवली जाईल.
अशाच नव-नवीन योजनेबद्दल अधिक माहिती करिता आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.
हा ग्रुप Private ग्रुप असल्यामुळे आपला नंबर फक्त ग्रुप admin लाच दिसेल तरी निश्चिंत ग्रुप join करा.
- jee mains 2024 Application Process And Last Date.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया